मित्रांनो काही महिन्यांपूर्वी (म्हणजे गणेश उत्सवादरम्यान) मी ह्या ब्लॉगवर मराठीतला माझा पहिला लेख (ह्या ब्लॉगवर) लिहिण्याचे मनोगत व्यक्त केले होते. पण नंतर ते राहूनच गेले.
पण आज एका विशिष्ट दिवशी माझी इच्छा पूर्ण होत आहे.
आज ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या’ ३८५ व्या जयंती निमित्त मी ह्या ब्लॉगवर हा पहिला ‘मराठी’ लेख (वृतांत) आपल्या समक्ष प्रस्तुत करीत आहे.
कृपया आपला अभिप्राय आणि सूचना अवश्य कळवाव्यात हि विनंती.
______________________________________________________________
आज १९ फेब्रुवारी २०१५ हा दिवस गुजरात मधील कच्छ येथील मुन्द्रा येथे वास्तव्य करणाऱ्या
मराठी बांधवांसाठी एक आनंदाचा आणि महत्वाचा दिवस ठरला.
आज पहिल्यांदा मुन्द्रा ह्या ठिकाणी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘जयंती’ उत्सव साजरा करण्यात आला.
मुन्द्रा इथे बरेच वर्षांपासून पुष्कळ मराठी बांधव नौकरी कामाच्या निमित्ताने स्थायिक झालेले आहेत आणि पुष्कळ जण तर इथेच स्थायिक सुद्धा झालेले आहेत.
सन २००५ ला पहिल्यांदा इथे ‘हिंगलाज नगर युवक मंडळ’ आणि ‘महाराष्ट्र मंडळाच्या’ वतीने सार्वजनिक गणेश उत्सव सुरु करण्यात आला. पण सलग पाच वर्ष सुरळीत पार पडल्यावर आणि काही लोकांच्या बदल्या झाल्यामुळे म्हणा किंवा कामाचा व्याप वाढल्यामुळे बरीचशी मंडळी विखुरल्या गेली आणि हळू हळू महाराष्ट्र मंडळाचा कारभार थंड पडत गेला.
पण सर्व मराठी बांधव आपल्या आपल्या परीने घरी आणि आप-आपल्या ‘सोसायटी’ मध्ये सर्वच सण वेळोवेळी साजरे करत आले.
असेच येथील एका ‘कलापूर्ण सोसायटी’ मध्ये राहणारे श्री. उदय पतंगराव (मूळ गाव- मुरबाड जिल्हा –ठाणे) यांनी पुढाकार घेऊन श्री.अष्टविनायक मंडळाची स्थापनी केली आणि दीड दिवसांचा गणपती ते साजरा करीत आले आहेत.
परदेशी राहून आपला ‘बाणा’ जपण्याचे कार्य सातत्याने बरेच जण करीत असतात. आणि आजच्या ह्या ‘स्व-प्रसिद्धीच्या’ युगात सुद्धा निस्वार्थपणे कार्य करणारे पण बरीच मंडळी असतात.
असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे मूळ गाव- आटपाडी, जिल्हा-सांगली येथील आणि जवळपास ७/८ वर्षांपासुन मुन्द्रा इथे वास्तव्यास असलेले श्री.संतोष गायकवाड.
त्यांचा उत्साह आणि कार्य पाहून मला आनंद तर झालाच पण आश्चर्यहि वाटले. कारण पहिल्यांदा मी शिवाजी महाराजांची जयंती, हि घरात, एखाद्या सणा सारखी साजरी करताना पाहिले.
W
गेले तीन वर्ष श्री. गायकवाड, श्री.उदय पतंगराव आणि श्री.संजय भोंसले हे शिवाजी जयंतीचा उत्सव श्री.गायकवाड ह्यांच्या घरी साजरी करीत होते.
श्री. शिवाजी महाराजांची जयंती, त्यांचा ‘राज्याभिषेक-दिन’ आणि महाराजांची ‘पुण्यतिथी’ ह्या तिन्ही दिवशी श्री.गायकवाड हे आपल्या घरी तोरण बांधून महाराजांच्या फोटो ला हार तुरे अर्पण करून आणि रणजीत देसाई यांची ‘श्रीमान योगी’, ‘छावा’ या कादंबऱ्यांना हळद कुंकू वाहून, हे दिवस साजरे करतात, आणि महाराजांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहतात.
या वर्षी या तिघांनी मिळून आणि मुन्द्रा इथे लहानपणा पासून वाढलेले श्री.देवेंद्र निगडे (हिंगलाज युवक मंडळ आणि महाराष्ट्र युवा मंडळाचे कार्यकर्ते) यांच्या साथीने मुन्द्रा इथे ‘श्री.शिवाजी महाराजांच्या जयंती’ उत्सवाला सुरुवात केली.
आज सर्व मराठी बांधव तथा भगिनी सुद्धा यांनी एकत्र येऊन स्थानिक देवीच्या मंदिरात पूजा केल्यानंतर, मशाल यात्रा काढण्यात आली. आणि ठरल्या प्रमाणे स्थानिक क्षेत्रपाळ नगरात श्री.विष्णू नारेवाडकर यांच्या घरासमोर उभारण्यात आलेल्या मंडपात श्री.शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन करून पूजा करण्यात आली. (ऐनवेळी कार्यक्रम ठरल्यावर केवळ दोन-तीन दिवस हातात असताना सुद्धा खास मुंबईहून महाराजांची मूर्ती मागविण्यात आली)
महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर दूर थेट पाकिस्तान च्या सीमेलगतच्या भागात कच्छ्-गुजरात मधे आज महाराजांचे पोवाडे, संताची भजने आणि ‘शिवाजी महाराज कि जय’, ‘जय भवानी-जय शिवाजी’ ह्या उदघोशानी आसमंत दुमदुमला.
!! शिवरायांचे आठवावे रूप !! शिवरायांचा आठवावा प्रताप !!
शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, ह्यांची नुसती नावे जरी घेतली तरी मराठी मने कशी आनंदाने, स्वाभिमानाने फुलून येतात – आज त्याही पुढे जाऊन ती एकत्र आलीत आणि एक नवीन सुरुवात झाली.
अभिनंदन!!
खरेच काल चा छत्रपति चा सोहळा खुप अप्रतिम होता,प्रत्येक कार्यक्रत्याने खुप मोलाच वाटा उचलून हा उत्सव आनंदाने अणि उत्साहाने पार पाडला,
असा सोहळा खुप कमी वेळात करुण दाखवने ही एक जिद्द मराठी बाधवात पाहून छाती गर्वाने फुलुं न गेली,
पूर्ण मुंद्रा शहर हर हर महादेव,जय भवानी,जय शिवाजी च्या जय घोषणे दुम दुमलि होती,
अशीच एकता अंखड़ता चिरकाळ राहों ही सदिच्या!!
तुमच्या लेखनी ला सलाम!!
असेच लेख तुम्ही लिहित जावे ही अणि आम्ही वाचत रहावे!!
पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांचे खुप खुप आभार!!
जय भवानी जय शिवाजी!!
अनिल अल्हाट जी – आपल्या अभिप्रायाबद्दल आभार !!
जय भवानी जय शिवाजी!!
अभिप्रायाबद्दल धन्यवाद !!!
Pharach chhan.Lekh pahila watatach nahi.Dhanyawad.
साहेब आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद !!!
Very good.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद !!!